भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे आता हा दौरा होणार की नाही, याबाब संभ्रम आहे. पण हा दौरा यशस्वी करण्याचे प्रयत्न सध्या ऑस्ट्रेलिया करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच भारताच्या या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया एक नवीन फंडा वापरणार असल्याचे समजत आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक हा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. पण त्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतरही भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्येच राहणार आहे. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी क्रिकेट मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारतालला प्रत्येक देशात चांगली मागणी असते. भारतीय संघ दौऱ्यावर आला की आर्थिक गणितंही चांगली जुळून येतात, हे सर्व क्रिकेट विश्वाला माहिती आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ही संधी सोडायची नाही. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने सहा महिने तरी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवणार, असे सांगितले आहे. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाला हा दौरा यशस्वी करायचा असल्याने त्यांनी एक नवा फंडा आणला आहे.

भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा होण्यासाठी अजून बऱ्याच महिन्यांचा कालावधी आहे. पण सध्याची परिस्थिती ही करोना व्हायरसमुळे चिंताग्रस्त आहे. ही परिस्थिती सामान्य कधी होणार, याबाबत कोणालाच अंदाज लावता येत नाहीए. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलिया एक नवीन फंडा आणू शकते. कारण क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने एक संदेश पाठवला आहे. त्यानुसार जर हा दौरा करायचा असेल तर खेळाडूंची व्यवस्था चोख करावी लागेल. त्यामुळे खेळाडूंच्या राहण्यासाठी नवीन बांधलेले हॉटेल वापरण्यात येऊ शकते. जेणेकरून खेळाडूंना चांगली जागा तर मिळेलच, पण कोणत्याही अन्य व्यक्तींचा संपर्क त्यांच्याबरोबर होणार नाही. ऑस्ट्रेलियामध्ये हे हॉटेल २० लाख डॉलर खर्च करून बांधण्यात आले आहे. त्यामुळे हे हॉटेल नवीन असल्यामुळे खेळाडूंना कसलीच समस्या जाणवणार नाही. त्याचबरोबर त्यांना बराच वेळही मिळू शकतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here