मुंबई: काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ‘मला कोणीतरी काहीतरी काम द्या’ अशी विनंती करणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता आता मात्र बऱ्याच सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताहेत. नीना याच्या भूमिका गाजल्या त्याहून जास्त त्यांचं खासगी आयुष्य चर्चेत होतं आणि आहे. गेल्या वर्षी नीना गुप्ता यांचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ प्रकाशित झालं. या पुस्तकातही त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या.
‘हे तर लज्जास्पद!’ गँगरेप प्रवृत्तीला खतपाणी घालणारी जाहिरात पाहून भडकले कलाकारनीना यांनी नुकताच त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला. नीना यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लेक मसाबा हिनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं नीना यांचे काही न पाहिलेले फोटो देखील शेअर केले आहेत. बर्थडे पोस्ट शेअर करताना मसाबानं एक खास मेसेजही लिहिला आहे. मसाबानं नीना यांच्या तरुणपणातील फोटो शेअर करत मी सर्वात कणखर व्यक्तमत्व पाहिलंय, असं लिहिलं आहे. सगळ्यात महान माझी आई…तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशी ही मसाबाची पोस्ट आहे.
अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, १०० कोटींपर्यंत जाणंही झालंय मुश्कील


बायोपिक येणार?
बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे बायोपिक हे समीकरण सिनेइंडस्ट्रीला काही नवीन नाही. या चरित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार असल्याचं समजतं. नीना गुप्ता यांच्या जीवनावर बायोपिक येणार असल्याचं समजतं. त्यांनी स्वत: याबाबत एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. यासंदर्भात निर्मात्यांशी चर्चा करत असल्याचंही त्या म्हणाल्या.

नीना यांनी त्यांच्या आयुष्यावर ‘सच कहूं तो’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. गेल्या वर्षी त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं. त्या म्हणाल्या, ‘मला बायोपिक तयार करायचा आहे; पण हा फक्त एक विचारच आहे. खरंच यावर चित्रपट होऊ शकतो की नाही हे फक्त निर्माताच ठरवू शकतो. मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. याबद्दल मी फारसा विचार करतही नाहीय.’

वैविध्यपूर्ण आणि लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या नीना यांच्या आयुष्याबद्दल याआधीही बरंच काही लिहिलं गेलं आहे. आता प्रत्यक्ष त्यांनीच लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन त्यांच्या आय़ुष्यावर सिनेमा येणार असेल तर चाहत्यांसाठी ती खुशखबरच म्हणावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here