नाशिक : नाशिक शहरात जून महिन्यातला दुसरा तर दोन महिन्यातील आठवा खून झाला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमधील गंगाविहार हॉटेलनजिक असलेल्या कंपनीबाहेर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता उद्योजकावर सपासप वार करण्यात आले. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी तलवार आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नंदकुमार आहेर (५० रा. महात्मानगर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर वीस वर्षाच्या आतील असल्याचा अंदाज असून त्यांचा शोध सुरू आहे. नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर हे कंपनीत गेले असताना प्रवेशद्वारावर कारमधून उतरत होते. यावेळी पाठीमागून आलेल्या तिघा दुचाकीस्वारांनी आहेर यांच्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. अधिक रक्तस्त्रावामुळे आहेर जागीच कोसळले. आवाज ऐकून कंपनीतून धावत आलेल्या कामगारांनी त्वरित उपचारासाठी आहेर यांना रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Monsoon news 2022 : मान्सून ६ दिवसांनी लांबला, वाचा हवामानाचे नवे अपडेट्स
याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तिघांचा शोध सुरू आहे. अंबड पोलिसांसह गुन्हे शाखा व आयुक्तालयाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मे महिन्यात सहा आणि जूनमध्ये दोन खून झाल्याने नाशिक हादरले आहे. दरम्यान, मयत आहेर हे मंत्रीमंडळातील सदस्यांचे आप्तेष्ट असल्याचे समजते. यामुळे पोलीस अधिक बारकाईने खूनाच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

मुंबई आणि ठाणेकरांचं आवडतं ठिकाण पावसाळ्यात राहणार बंद, पर्यटकांमध्ये नाराजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here