मुंबई: सिनेसृष्टीमध्ये ‘सैराट’ या सिनेमातून दणक्यात एंट्री करणारी रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आज यशाच्या शिखरावर आहे. हिंदी असो वा मराठी, सिनेमा असो वा वेब सीरिज या अभिनेत्रीने सगळीकडे तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru Photo Viral) हिचा एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारा ठरू शकतो. कारण या फोटोमध्ये तिचा चेहरा भाजलेला दिसत आहे.

दरम्यान हा फोटो पाहून काळजी करण्याचं कोणतंही कारण नसून हा फोटो अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ (Aathava Rang Premacha) या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या सिनेमामध्ये रिंकू राजगुरू एका अ‍ॅसिड अटॅक झालेल्या मुलीची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला आहे.

हे वाचा-मराठीतून बोलायचं म्हणून घाबरली काजोल, ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरचा VIDEO VIRAL

स्त्रियांवरील अत्याचारावर भाष्य करणारा हा ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये एक लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून १७ जून रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटात रिंकू राजगुरूनं अ‍ॅसिड अटॅकमधून बचावलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. याकरता रिंकूच्या मेकअपकरता विशेष मेहनत घेण्यात आली असून तिने यात पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे. याच मेकअपमधील लूकचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिंकू राजगुरू

‘आठवा रंग प्रेमाचा’मधील रिंकू राजगुरूचा लूक

अ टॉप अँगल प्रोडक्शनच्या समीर कर्णिक यांनी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव , राकेश राऊत प्रोडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

हे वाचा-मालिकेतली लोकप्रिय ‘आई’ वास्तवात आहे तरी कशी? वाचा काय म्हणते अरुंधती ते!

चित्रपटाची कथा, दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे आहे. ते या सिनेमातून डेब्यू करत आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद समीर कर्णिक यांचे असून समीर कर्णिक यांनी ‘क्युं हो गया ना..’ या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यांच्या नावे ‘यमला पगला दिवाना’, ‘चार दिन की चांदनी’, ‘हिरोज’ हे सिनेमा देखील आहेत. चित्रपटाचे अतिरिक्त संवाद हृषीकेश कोळीचे आहेत. या सिनेमातील गाणी कुणाल गांजावाला, सोनू निगम, आदर्श शिंदे, शाहिद मल्ल्या, साक्षी होळकर यांनी गायली आहेत. रिंकू राजगुरू व्यतिरिक्त या सिनेमात अभिनेता मकरंद देशपांडे आणि विशाल आनंद हा नवा दिसणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच लाँच झाला असून त्यावर काही वेळातच चांगले Views आले आहेत. दरम्यान चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला होता. यातील गाणं देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रिंकूच्या नव्या भूमिकेसाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असल्याचे यावर आलेल्या कमेंट्समधून दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here