मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीतलं एक रत्न म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. म्हणजेच सर्वांचे लाडके अशोक मामा. यंदा आपल्या सिनेनाट्य कारकिर्दीची ५० वर्षं पूर्ण करणाऱ्या अशोक मामांनी ४ जूनला वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. यानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी जुन्या -नव्या सर्वच गोष्टींवर चर्चा केली.
‘मी त्या व्यक्तीचा द्वेष करते…’, भाजलेल्या चेहऱ्यासह रिंकू राजगुरूचा फोटो होतोय VIRAL, वाचा फोटोचं सत्य
जुने दिवसातील आठवणी तर त्यांनी शेअर केल्याच, पण सध्याची सिनेसृष्टी, चित्रपट नाटक यावरही त्यांनी भाष्य केलं. मराठी प्रेक्षकांबद्दलही मामा बोलले. मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांबाबत बोलताना अशोक मामा म्हणाले की, ‘आपल्या चित्रसृष्टीत आशयघन चित्रपट येतात, हे कौतुकास्पद आहेच; पण कौतुक होणं आणि चित्रपट हिट होणं, यांत खूप फरक आहे. आज वेगवेगळे व उत्तम विषय निवडण्याची चांगली परंपरा सुरू झाली आहे; पण अनेक जण मांडणीत फसतात. आशयघन चित्रपट शहरांत चालून जातील, ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना निखळ मनोरंजन हवं असतं,’ असं सांगून प्रेक्षकांबाबत ते म्हणाले, ‘शहरांतला प्रेक्षकही आज मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांत विभागला गेला आहे.

‘सैराट’ चित्रपटाच्या विषयात तसं नावीन्य नव्हतं; पण त्याची ग्रामीण पार्श्वभूमी, मांडणी आणि धक्का देणारा शेवट-तोही ग्रामीण भागातला, हे महत्त्वाचे गुण होते. गाणी हिट होती. मराठी प्रेक्षक चोखंदळ आहेत. तसं नसतं, तर दादा कोंडके, निळू फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे कधी चित्रपटात नायक होऊच शकले नसते. प्रेक्षकांना चेहऱ्यांपेक्षा त्यांचं काम महत्त्वाचं वाटतं.’, असं अशोक सराफ म्हणाले.

Ashok Saraf Interview: लक्ष्यासोबत केलेल्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा घसरला? अशोक सराफ स्पष्टच बोलले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here