बारामती : बारामती तालुक्यातील सांगवी येथील एका महिलेचे नग्न फोटो एका विकृताने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लक्ष्मण मच्छिंद्र वीर (रा. रांजनगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) याच्याविरोधात बारामती पोलीस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण वीर याने एका तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवून त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर तरुणीने पुन्हा भेटण्यास नकार दिल्याने या विकृत इसमाने हे व्हिडिओ आणि फोटो व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवल्याचा प्रकार घडला. याबाबत बारामती जवळील सांगवीच्या एका वस्तीवर राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

रात्री गाडी घेऊन निघाला तो परतलाच नाही, रत्नागिरीत क्रीडा शिक्षकाची अपघाती एक्झिट

लक्ष्मण वीर याची बहीण तक्रारदार महिलेच्या शेजारी राहत होती. तो बहिणीकडे राहायला असताना त्याची सप्टेंबर २०२१ मध्ये पीडित महिलेशी ओळख झाली. तिचा पती नोकरीस गेल्यावर तो तिच्या घरी गप्पा मारण्यासाठी येत होता. यातून त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये तो त्याच्या गावी निघून गेला. त्यानंतर २५ एप्रिल २०२२ रोजी वीर याने महिलेला फोन करत लॉजवर भेटायला बोलावले. नंतर या महिलेला त्याच्याशी संबंध ठेवायचे नसल्याने तिने त्यास नकार दिला. त्याच दिवशी आरोपीने तिला दोघांचे नग्न फोटो पाठवले. तसंच तू जर मला भेटायला आली नाहीस तर, हे फोटो तुझ्या नवर्‍याला व भावाला पाठवीन अशी धमकी त्याने दिली. तक्रारदार महिलेने ही बाब तिच्या पतीला सांगितली. मात्र आरोपीने २७ मे रोजी स्वतःच्या व्हाटसअ‍ॅप स्टेटसला दोघांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो ठेवले होते. याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here