बर्मिंगहॅम इथे दोघं एका रेस्टाॅरंटमध्ये आपल्या मित्रांबरोबर डिनरला गेले होते. ते रेस्टाॅरंट होतं भारतीय. आणि जेवणाचं बिल किती आलं ठाऊक आहे का? बिल आणि टिप धरून ४९ लाख रुपये. असं कळलंय की जाॅनी डेप अंबर हर्डविरोधातला खटला जिंकला, म्हणून हे सेलिब्रेशन होतं.
सलमान खाननं त्याचं गाणं ऐकलं आणि मिठीच मारली, जगातला हा सर्वात छोटा गायक आहे
खरं तर जाॅनी डेप या म्युझिक टूरला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले होते. जाॅनी आणि जेफ बेक कधी पबच्या बाहेर, तर कधी रेस्टाॅरंटमध्ये दिसले. डेली मेलच्या बातमीनुसार दोघांनीही एका भारतीय रेस्टाॅरंटमध्ये डिनर केला. तिथे दोघांनी बटर चिकन आणि नान यावर ताव मारला. सोबत काॅकटेल आणि रोजे शँपियनही घेतली. जाॅनी आणि जेफसोबत अजूनही काही जण होते.

वाराणसी रेस्टाॅरंटमध्ये ५ तास सुरू होती पार्टी
रिपोर्टनुसार जाॅनी डेप रविवारी आपल्या मित्रांबरोबर बर्मिंगहॅम इथल्या वाराणसी या लोकप्रिय रेस्टाॅरंटमध्ये पोहोचला. त्यानं तिथल्या कर्मचाऱ्यांबरोबर फोटोही काढले. त्यादिवशी इतर कोणासाठी हे रेस्टाॅरंट बंद होतं. तिथे फक्त सुरू होती, जाॅनी डेपची पार्टी. जाॅनी डेप आणि त्याचे मित्र रात्री उशिरा रेस्टाॅरंटमधून बाहेर आले. रेस्टाॅरंटचे ऑपरेशन्स डायरेक्टर मोहम्मद हुसेन म्हणाले, ‘ ते आमचे खास गेस्ट होते. ते साधे आणि हसतमुख आहेत. सर्वसामान्यांसाठी त्या दिवशी रेस्टाॅरंट बंद ठेवलं होतं.’
‘मी त्या व्यक्तीचा द्वेष करते…’, भाजलेल्या चेहऱ्यासह रिंकू राजगुरूचा फोटो होतो
जाॅनी डेपनं दिली होती ही ऑर्डर
हुसेननं सांगितलं की, जाॅनी डेप आणि त्याच्या मित्रांना बटर चिकन, पनीर टिक्का, लॅम्ब कडई आण किंग प्राॅन भुना अशी ऑर्डर दिली. सोबत नान, भात आणि सॅलडही ऑर्डर केलेलं. याचा खर्च जवळ जवळ ५० हजार ब्रिटिश युरो म्हणजे ४८ लाख ६२ हजार रुपये आला.
Thread Chicken Recipe | न्यूडल्स आणि चिकनपासून बनवा टेस्टी स्टाटर्स | Maharashtra Times