मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री हिच्या घरी मुंबई पोसिल पोहचल्यानंतर चर्चेला एकच उधाण आलं होतं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओत पोलिस मलायकाच्या घरी गेल्याचं गेल्याचं दिसून येत आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यानं हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पोलिस मलायकाच्या बिल्डींगच्या लॉबीत तिच्याची बोलताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेमकं काय झालं, अशा चर्चा सुरू होत्या. तर एका कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यासाठी पोलिस मलायाकाच्या घरी गेले होते, असं समोर आलं आहे.
मलायकाचीच चर्चा
बॉलिवूडची हाय प्रोफाइल पार्टी असो किंवा एखाद्या रिअॅलिटी शोचे परिक्षण अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच स्टायलिश अंदाजात दिसली आहे. अलीकडेच फिल्ममेकर करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये मलायका स्पॉट झाली होती. यामध्ये तिने निऑन कलरचा पँटसूट परिधान केला होता. ती अनेकदा रिअॅलिटी शोच्या मंचावरही ट्रेंडी आउटफिट कॅरी करताना दिसते.