नाशिक : राज्यात राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या खासदार पदाच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रतील ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात उतरल्याने भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीत चांगलीच चुरस निर्माण झाली असून दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं दिसत आहे. तसचं आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी दोघांकडून डावपेच आखले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, कृषीमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.

दादा भुसेंनी घेतली एमआयएमची भेट

आपल्या पारड्यात अधिकाधिक मते मिळावीत यासाठी प्रत्येक उमेदवार, नेते विचार करीत आहेत. मत फिरविण्यासाठी विरोधक एकमेकांच्या मते फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या पक्षाचे आमदारांसह अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. राज्यात एमआयएमचे केवळ दोनच आमदार असून. यापैकी मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहमद ईस्माइल हे एक आहेत. मौलाना यांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान करावे, यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली. या चर्चेदम्यान, पक्षक्षेष्टींचा निर्णय मान्य असणार असून अजून पक्षश्रेष्टींचा आदेश आला नसल्याचे मौलाना मुफ्ती यांनी सांगितले.

धनंजय महाडिकांसाठी अख्खं कुटुंब मैदानात, आमदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी २५ टीम्स
महाविकास आघाडीने मदत मागितल्यास आम्ही त्याचा विचार करु

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांची मतं मिळवण्यासाठी सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. सध्याची परिस्थिती पाहता या निवडणुकीत एका मतामुळेही निकाल बदलू शकतो. ‘राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केलेला नाही. त्यांनी संपर्क केला तर बघू. महाविकास आघाडीला पाठिंबा हवा नसल्यास आम्ही आमचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेऊ. पण महाविकास आघाडीने मदत मागितल्यास आम्ही त्याचा विचार करु’, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते.

सौरभ गोखले साकारणार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, झाली ‘कालजयी सावरकर’लघुपटाची घोषणा
शिवसेनेनं आणखी एका जिल्हाप्रमुखाला दिलं निष्ठेचं बक्षीस; आमशा पाडवी कोण आहेत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here