मुंबई : राज्यसभा निवडणुकांची धामधूम सुरु असतानाच विधानपरिषद निवडणुकांसाठीही उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेकडून पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि नंदुरबारचे सेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी या दोघांना तिकीट मिळाल्याची माहिती आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवबंधन हाती बांधलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या विजयात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने अहिर यांचे हात बुलंद केल्याचं चित्र आहे.

कोण आहेत सचिन अहिर?

सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नीने श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. वरळी फेस्टिव्हल आणि दहीहंडीच्या काळात भव्य स्पर्धा ते आयोजित करत असत.

१९९९ मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये ते पुन्हा विजयी झाले. २००९ मध्ये त्यांच्यावर गृहनिर्माण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची धुरा होती. २०१४ मध्ये त्यांना शिवसेना उमेदवार सुनील शिंदे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यावेळी ते मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी होते. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं केल्याची त्यांना बक्षिसी मिळताना दिसत आहे. २०२० मध्येच त्यांना शिवसेना उपनेतेपद बहाल करण्यात आलं होतं, तर २०२१ त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलं होतं. आता त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती होताना दिसत आहे.

हेही वाचा : शिवसेनेचं पुन्हा धक्कातंत्र; विधानपरिषदेसाठीही सर्वसामान्य शिवसैनिकाला दिली संधी

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. भाजपकडे दहापैकी चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे.

हेही वाचा : शिवसेनेनं आणखी एका जिल्हाप्रमुखाला दिलं निष्ठेचं बक्षीस; आमशा पाडवी कोण आहेत?
विधानपरिषदेसाठी किती मतांची आवश्यकता?

विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला २७ मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ ११३ इतकं होत असल्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. त्यानंतरही ज्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहतील त्यांना दुसऱ्या उमेदवारासाठी १२ मतांची तजवीज करावी लागणार आहे.

हेही वाचा : विधानपरिषद : भाजपच्या ७ नावांची चर्चा, दरेकर निश्चित, पंकजा, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आघाडीवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here