राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या अर्जाला ईडीनं विरोध केला आहे.

 

Anil Deshmukh Nawab Malik
अनिल देशमुख नवाब मलिक

हायलाइट्स:

  • ईडीचा नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या अर्जाला विरोध
  • कैदी असल्यानं मतदानाचा अधिकार नाही
  • मलिक आणि देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी ईडीची भूमिका
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करणाऱ्या महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टात मतदानासाठी एका दिवसाचा जामीन मिळावा म्हणून केलेल्या अर्जाला ईडीनं विरोध केला आहे. ईडीनं लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो, असं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं आहे. आता न्यायालय उद्या काय निर्णय देणार याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे.

मलिक देशमुखांना मतदानाला परवानगी नको, ईडीची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १० जून रोजी राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीसाठी विधान भवनात मतदान करण्यास परवानगी देऊ नये, अशी भूमिका ईडीनं विशेष पीएमएलए कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. ईडीने विरोध दर्शवल्याने आता उद्या कोर्ट सुनावणीअंती काय निर्णय देते त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘‘मलिक व देशमुख हे त्या-त्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्य आरोपी आहेत आणि कैद्यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत मतदानाचा हक्क नसतो. त्यामुळे एक दिवसाच्या तात्पुरत्या जामिनाबाबत दोघांनी केलेले अर्ज फेटाळून लावावेत’’, असे ईडीचे प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : rajya sabha election update ed opposed anil deshmukh and nawab malik applications of bail for voting
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here