मान्सूनपूर्व पावसाचा नाशकाला चांगलाचं तडाखा बसला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने नाशिकाच्या ग्रामीण भागात पार धुमाकूळ घातला असून सर्वात जास्त फटका देवळा तालुक्यातील गिरणारे येथे बसला आहे.

 

pre monsoon news nashik 3rd day premonsoon rain loss of farmers
सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाचा नाशकाला तडाखा, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान

हायलाइट्स:

  • सलग तिसऱ्या दिवशी नाशकात मान्सूनपूर्व पाऊस
  • नाशकातील शेकडो टन कांदा पावसात भिजून खराब
  • गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान
नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने नाशिकाच्या ग्रामीण भागात पार धुमाकूळ घातला असून सर्वात जास्त फटका देवळा तालुक्यातील गिरणारे येथे बसला आहे. वावळ, गारपीट आणि मुसळधार पावसाने या भागात हाहाकार माजविल्यामुळे अनेक घर आणि शाळेची छप्पर उडाली, शेकडो वृक्ष उन्मळून पडली. सुमारे ५० पेक्षा जास्त विजेचे खांब पडून वीज पुरवठा खंडित झाला तर उघड्यावर असलेला शेकडो टन कांदा भिजून खराब झाला असून पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

दूर उडालेली छप्पर, उघड्यावर पडलेले संसार, भिजलेली पुस्तके आणि ते सावरत असलेला चिमुकला असं भयावह दृश्य देवळा तालुक्यातील गिरणारे येथील आहे. गिरणारे येथे वादळी वाऱ्यासह झालेली गारपीट आणि मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. वादळाचा तडाखा सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वानाच बसला आहे. मान्सून पूर्व पावसाने हजेरी उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतातल्या उभ्या पिकांच्या चिंतेनं शेतकऱ्यांची झोप देखील उडाली आहे. मान्सूनपूर्व सुरू झालेल्या पावसामुळे यंदा वेळेवर खरिपाच्या पेरणीला सुरुवात होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

गोपीचंद पडळकर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला; म्हणाले…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : pre monsoon news nashik 3rd day premonsoon rain loss of farmers
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here