मुंबई: भारतीय कंपन्यांमध्ये पुढील ६ महिन्यांत मोठ्या घडामोडी घडणार आहेत. एम्प्लॉयमेंट एँड रिक्रूटमेंट एजन्सी मायकल पेजनं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशाच्या कंपन्यांमधील ८६ टक्के कर्मचारी पुढल्या ६ महिन्यांत नोकरी सोडण्याच्या तयारीत असल्याचं हा अहवाल सांगतो.

अहवालातील माहितीनुसार, पुढील ६ महिने कंपन्यांमध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरू राहील. वैयक्तिक आयुष्य आणि नोकरी यांच्यामध्ये संतुलनासाठी ६१ टक्के कर्मचारी कमी पगारावर नोकरी करण्यास तयार आहेत. गेल्या २ वर्षांपासून हा ट्रेंड दिसून येत आहे. २०२२ मध्ये यात आणखी वाढ होईल.
Aadhaar Card: आधार कार्डवरील फोटो आवडला नाही? या सोप्या प्रोसेसने सहज करा बदल
सर्वच उद्योगांमध्ये राजीनाम्याचा ट्रेंड दिसेल. विविध वयोगटातील कर्मचारी राजीनामे देतील. याचं प्रमाण कमी होण्याचे कोणतेही संकेत नाहीत. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये कंपन्यांतील अनेक चांगले कर्मचारी नोकऱ्या सोडतील. करोना काळानंतर कंपन्यांचं धोरण बदललं आहे. नव्या धोरणांमुळे नाराज असलेल्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. यापैकी ११ टक्के कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर अनेकजण राजीनाम्याच्या विचारात आहेत.

करिअरमधील प्रगती, पगारवाढ, पदोन्नती या कारणांमुळे कर्मचारी राजीनामा देतील. कामाच्या ठिकाणी उत्तम वातावरण देणाऱ्या कंपन्यांना कर्मचारी प्राधान्य देतील, असं मायकल पेजचा अहवाल सांगतो. बोनस आणि प्रोत्साहन पुरस्कारांमुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यास अधिक हुरूप येतो, असंदेखील अहवालात नमूद करण्यात आलं.

कामाचे वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here