मुंबई: धारावीत सकाळी करोनाचे ११ रुग्ण सापडलेले असतानाच आता आणखी १५ रुग्ण सापडले आहेत. म्हणजे गेल्या १२ तासांत धारावीत २६ रुग्ण सापडल्याने धारावीतील करोना रुग्णांची संख्या ८६वर गेली आहे. शिवाय आज एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूही झाला असून धारावीतील मृतांचा आकडा ९वर गेला आहे.

गेल्या पाच तासांत सापडलेल्या या १५ नव्या करोना रुग्णांपैकी ११ रुग्ण धारावीतील मुस्लिम नगरमध्ये सापडले आहेत. त्यात चार महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण १३ ते ५८ या वयोगटातील आहेत. तर लक्ष्मी चाळमधील एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जनता सोसायटी, सूर्योदय सोसायटी आणि शिवशक्ती नगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. यात सूर्योदय सोसायटी, शिवशक्ती नगर, लक्ष्मी चाळमध्ये पहिल्यांदाच करोनाचे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.

धारावीत आतापर्यंत मुकुंदनगर आणि मुस्लिम नगरमध्ये आतापर्यंत प्रत्येकी १८, सोशल नगर आणि जनता सोसायटीत प्रत्येकी ८, डॉ. बलिगा नगरमध्ये ५, कल्याणवाडी, राजीव गांधी चाळ आणि शास्त्रीनगरमध्ये प्रत्येकी ४, मदिना नगर, मुरुगन चाळ आणि वैभव अपार्टमेंट्समध्ये प्रत्येकी दोन, धनवाडा चाळ, पीएमजीपी कॉलनी, नेहरू चाळ, इंदिरा चाळ, गुलमोहर चाळ, साईराज नगर, ट्रान्झिस्ट कँम्प, रामजी चाळ, सूर्योदय सोसायटी, लक्ष्मी चाळ आणि शिवशक्ती नगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर बलिगा नगरमध्ये ३, कल्याणवाडीत २, मुस्लिम नगर, लक्ष्मी चाळ, सोशल नगर आणि नेहरू चाळीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

माहिममध्ये पोलिसाला लागण

धारावीच्याच बाजूला असलेल्या माहिममध्ये एका पोलिसाला करोनाची लागण झाली आहे. ३१ वर्षाचा हा पोलीस शिपाई खार पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असून माहिमच्या पोलीस कॉलनीत राहतो. माहिममध्ये आज आणखी एक करोना रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची संख्या १०वर गेली आहे. यात पाच महिलांचा समावेश असून तिघीजणी ब्रीच कँडी रुग्णालयातील नर्स आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here