HSC Result How to check : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Result News) जाहीर होणार आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल  कधी लागणार याकडं राज्याचं लक्ष होतं. काल अखेर याबाबत घोषणा झाली. आज निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा निकाल कुठं आणि कसा पाहायचा असा सवाल देखील विद्यार्थी आणि पालकांच्या समोर येत असेल. तर यावेळी हे अजूनच सोपं आहे. कारण आपण एबीपी माझाच्या वेबसाईटवर देखील हा निकाल पाहू शकणार आहोत. 

आज दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येईलच. शिवाय यंदा ‘एबीपी माझा’च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यावर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. पण, यावेळी बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे.  

कुठे पाहाल निकाल? 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज म्हणजेच, मंगळवारी 8 जून 2022 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांन ‘ABP Majha’च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 

कसा चेक कराल आपला निकाल

स्टेप 1 – https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा

स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा

स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका

स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा

स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 

स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांची संख्या

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487  विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख  85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. 

दहावीचा निकालही लवकरच

दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. अशातच, आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 

राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये 12वीचा निकाल आधीच लागला आहे, महाराष्ट्राच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना होती. देशाच्या पातळीवरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची दिशा या निकालानंतर स्पष्ट होते. 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला ‘ABP Majha’च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here