CM Uddhav Thackeray | आज सकाळी भाजपकडून गुलमंडी परिसरात टेम्पो भरून बॅनर्स आणण्यात आले. त्यानंतर हा टेम्पो चौकाचौकात फिरवून भाजपकडून शिवसेनेविरोधात बॅनर्स लावले जात आहेत. शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये आठ जून १९८५ रोजी स्थापन झाली होती. या शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंची सभा
औरंगाबाद:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादमधील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. उद्धव (Uddhav Thackeray) यांच्या सभेसाठी शिवसेनेने औरंगाबादमधील वातावरण भगवेमय करुन टाकले आहे. चौकाचौकात भगवे झेंडे, मोठे बॅनर्स आणि भगव्या रंगाचे पट्टे शिवसेनेकडून (Shivsena) लावण्यात आले आहेत. मात्र, आता याच जागांवर भाजपकडून शिवसेनेच्या औरंगाबाद महानगरपालिकेतील कारभाराचे धिंडवडे काढणारे बॅनर्स लावायला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या गुलमंडी परिसरात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असे बॅनरवॉर रंगले आहे. (CM Uddhav Thackeray rally in Aurangabad) उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी मंचावरील पुतळ्याची चर्चा; आज मोठी घोषणा करणार? आज सकाळी भाजपकडून गुलमंडी परिसरात टेम्पो भरून बॅनर्स आणण्यात आले. त्यानंतर हा टेम्पो चौकाचौकात फिरवून भाजपकडून शिवसेनेविरोधात बॅनर्स लावले जात आहेत. शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये आठ जून १९८५ रोजी स्थापन झाली होती. या शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरुन भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. ‘आज औरंगाबादमधील पाणीप्रश्नाचा वर्धापनदिन आहे का?’, ‘संभाजीनगर नामकरणाच्या आश्वासनाचा वर्धापनदिन आहे का?’, असे सवाल भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आजच्या सभेत या सर्व आरोपांना काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त; १७ कॅमेरे, एक हजार पोलिस तैनात सभेच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली महिनाभरापासून तयारी केली जात आहे. चंद्रकांत खैरे यांनी संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला असून, अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गट-गणापर्यंत जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खैरे, दानवे यांनी केले आहे. सभेच्या पूर्वतयारीसाठी उपनेत्या डॉ. निलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर दोन दिवसांपासून औरंगाबादेत दाखल झाले होते.