नाशिक : मालेगाव-चाळीसगाव मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एसटी बस, पिकअप, ट्रॅक्टर आणि कार या वाहनांनी एकमेकांना धडक दिली असून या अपघातात एसटी आणि ट्रॅक्टर चालकासह काही प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की एसटीचा समोर भाग कापला गेला तर पिकअपचाही चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मालेगाव चाळीसगाव महामार्गावरून एसटी बस देवघट येथून मालेगावला येत होती, तर पिकअप चाळीसगावकडे जात होता. मात्र वाटेत या वाहनांचा अपघात झाला असून या यामध्ये एसटी आणि पिकअप चालकासह ५ ते ६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर मागून येणाऱ्या ट्रॅक्टर आणि कार या दोन्ही वाहनांनी देखील एसटीला धडक दिली. मात्र सुदैवाने त्यातील कोणीही जखमी झाले नाही.

मुंबईकरांनो, उद्यापासून मोठा बदल; आताच वाचा नाहीतर ३ महिन्यांसाठी परवाना होईल रद्द

दरम्यान, अपघात झाल्यानंतर बघ्यांनी दुर्घटनास्थळी मोठी गर्दी केली. तसंच या विचित्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

अर्रर्र… दारुड्याचा रस्त्यात धिंगाणा, नागरिकांनी दिला चोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here