लखनऊः उत्तर प्रदेशातील कासगंजमधील मनहेलावून टाकणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती महिलेला गोळ्या मारताना दिसतोय. लाजीरवाणीबाब म्हणजे महिलेला वाचवण्याऐवजी शेजाऱ्यांनी तिचे व्हिडिओ बनवले. महिला मदतीसाठी याचना करत होती. पण कोणीच पुढे आले नाही. आरोपीने पुन्हा तिला गोळी घातली. यात ती जागीच ठार झाली.

महिलेच्या हत्येचा व्हिडिओ गुरुवार सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. करणारा तरुण हा दिव्यांग आहे. मोनू असं त्याचं नाव आहे. त्याने गावातीलच ६५ वर्षीय श्यामवती या महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. गावठी कट्ट्याने त्याने महिलेवर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी आरोपी मोनूला अटक केलीय.

दिव्यांग तरुण मोनू पहिली गोळी महिलेवर झाडतो. ही गोळी महिलेच्या कमरेला लागते आणि ती जमिनीवर कोसळते. ती मदतीसाठी बोलवत होती. दुसरीकडे घराच्या छतावर उभे असलेले शेजारी या घटनेचा व्हिडिओ बनवत होते. त्यापैकी कुणीही पोलिसांना कळवलं नाही किंवा बोलावलं नाही. तसंच आरोपी मोनूला रोखण्याचा प्रयत्नही केला नाही.

… मग दुसरी गोळी झाडली

आरोपी मोनूने पहिली गोळी महिलेवर झाडल्यानंतर ती जखमी झाली. मोनूने ती वाचल्याचे पाहून पुन्हा दुसरी गोळी बंदुकीत भरली आणि तिच्या डोक्यात गोळी मारली. यानंतर तो फरार झाला. या व्हिडिओची दखल घेत जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. आरोपीला पकडण्यासाठी टीम नेण्यात आली. यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीला अटक केली

का केली महिलेची हत्या?

आरोपी मोनू हा महिलेचे घर हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. बऱ्याच कालावधीपासून प्रयत्न सुरू होता. पण मृत महिलेचा त्याला विरोध होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here