राज्यात १० जागांसाठी होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. एका जागेसाठी काँग्रेसने भाई जगताप यांचं नाव निश्चित केलं असलं तरी दुसरे नाव अद्याप गुलदस्त्यात असून पक्षात याबाबत अजूनही खलबतं सुरू आहेत.
भाजपने पाच उमेदवारांची घोषणा करत असताना प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड वगळता अन्य तीन नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जुन्या जाणत्या नेत्यांवरच पुन्हा विश्वास दाखवणं पसंत केलं आहे.
भाजपने कोणाला दिली उमेदवारी?
भाजपने काही वेळापूर्वी विधानपरिषद निवडणूक उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांच्यासह इतर नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.