परभणी : करमाड ते बदनापूर दरम्यान उड्डाण पुलाचं काम सुरू असल्यामुळे पाच दिवस लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक ११, १३, १५, १८ आणि २० जून २०२२ रोजी दुपारी ३:१५ ते ६:१५ दरम्यान तीन तास घेण्यात येणार आहे. त्यामुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस पाच दिवस उशीरा सुटणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये मराठवाड्यातून हैदराबादकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १७६५० औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस दिनांक ११, १३, १५, १८ आणि २० जूनला औरंगाबाद इथून तिची नियमित वेळ दुपारी १६.१५ वाजता सुटण्या ऐवजी १६० मिनिटं उशिरा सुटेल म्हणजेच सायंकाळी ६:५५ वाजता सुटणार आहे. तर गाडी क्रमांक १७६६१ काचीगुडा ते रोटेगाव ही गाडी दिनांक ११, १३, १५, १८ आणि २० जून रोजी परभणी ते जालना दरम्यान ९० मिनिटं उशिरा धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली आहे.
नितीन गडकरींनी ५ दिवसांत बांधला राष्ट्रीय महामार्ग, थेट गिनिज बुकमध्ये नाव; PHOTO पाहाच…

‘या’ जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय

औरंगाबाद – हैदराबाद आणि काचीगुडा ते रोटेगाव या दोन गाड्या पाच दिवस उशिराने धावणार असल्याने औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, लाइन ब्लॉकमुळे गाड्या उशिराने धावणार असल्याने प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Pre Monsoon Rain Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग, ‘या’ जिल्ह्यांना झोडपलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here