‘आर्या २’ , गुल्लक अशा हिंदी वेब सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी या अतुल यांच्या पत्नी आहेत. प्रयोगशील आणि प्रगल्भ अभिनेत्री अशी गीतांजली कुलकर्णी यांची ओळख आहे. त्यांनी ‘गुल्लक’ या वेब सीरिज मध्ये साकारलेल्या शांती मिश्रा या पात्राची सध्या चर्चा आहे.
पहिली भेट
१९९३ साली एनएसडी (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा)मध्ये अतुल आणि गीतांजली यांची पहिली भेट झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २९ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात दोघांनी लग्न केलं.
तू आणि पती अभिनेते अतुल कुलकर्णी यांची कामावरुन चर्चा होते का? असा प्रश्न गीतांजली यांना विचारला असता, स्वत:ची आणि इतरांची कामं बघून चर्चा होते, अगदी वादही होतात. त्यातही एक वेगळी मजा असते, असं त्या म्हणाल्या.
गीतांजली यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर, एका हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत त्या दिसणार आहेत. ‘रंगबाज’चा तिसरा सीझन येतोय. भाडिपाची एक हिंदी सीरिज येणार आहे, त्यातही त्यांनी काम केलंय.