शिर्डी / संगमनेर : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांची मतं मिळावी यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच न्यायालालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही याबद्दल साशंकता असतानाच त्यांना परवानगी मिळाली नाही तरीही महाविकास आघाडी चारही जागेवर विजयी होणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांपैकी २ भाजप, १ काँग्रेस, १ राष्ट्रवादी काँग्रेस तर २ जागा शिवसेनेच्या ( महाविकास आघाडी ) वाट्याला आल्या आहेत. म्हणजेच भाजप २ तर महाविकास आघाडी ४ जागांसाठी निवडणूक रिंगणात आहे. शिवसेनेच्या चौथ्या उमेदवारा विरोधात भाजपने उमेदवार दिल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह असून अपक्षांसह छोट्या पक्षांची मते पदरात पाडण्यासाठी दोन्ही बाजूंनी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेसकडून भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषदेची उमेदवारी
यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य करताना संजय पवार हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीची चौथी जागा निवडून यायला काहीच अडचण नसल्याचे म्हटले आहे. ही निवडणूक आमच्यासाठी अवघड नाही कारण आमच्याकडे अपक्षांसह मित्र पक्षांचे संख्याबळ असल्याचा दावा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. एमआयएम आणि सपाच्या भुमिकेवर बोलताना जे जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ, आम्हाला अनेकजण मदत करणारे आहेत असही थोरात म्हणाले.

Monsoon News 2022 : महाराष्ट्राला पावसाची वाट पाहावी लागणार, वाचा कुठे पोहोचला मान्सून?
आमदारांच्या हॉटेल वारीबद्दल विचारले असता महसूलमंत्री म्हणाले की, एकाही मताची चुक नको म्हणून काळजी घेतली जात आहे. कोणी गैरहजर राहीला तर खुप मोठा परिणाम होवू शकतो. आमचं गणित आम्ही व्यवस्थित केलं आहे आणि आम्ही ते यशस्वीपणे सोडवणार असल्याचे थोरात म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्या मतदानालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. १० जून रोजी विधानभवनात होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेता यावा यासाठी एक दिवसापुरता तात्पुरता जामीन किंवा मतदानाला जाऊ देण्याची मुभा द्यावी, अशी विनंती दोघांनी कोर्टाकडे अर्जांद्वारे केली आहे. मात्र, ईडीने दोघांना परवानगी देण्यासाठी विरोध दर्शविला आहे. मात्र मलिक आणि देशमुखांना मतदानाला परवानगी मिळाली नाही तरीही आम्ही विजयी होणार असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.

नितीन गडकरींनी ५ दिवसांत बांधला राष्ट्रीय महामार्ग, थेट गिनिज बुकमध्ये नाव; PHOTO पाहाच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here