लॉस एंजेलिस: हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता ब्रॅड पिट आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी (Brad Pitt Alleges Angelina Jolie) आणि प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हे विभक्त झाले आहेत. परंतु त्यानंतरही त्यांच्यातील वाद अद्याप संपुष्टात आलेले नाहीत. ब्रॅडनं अँजेलिनावर नव्यानं आरोप केले असून तिच्याविरोधात खटलाही दाखल केला आहे. अँजेलिनाचे प्लॅन अत्यंत विखारी असून त्यामुळे आपले अतोनात नुकसान होणार असल्याचा आरोप ब्रॅडनं केला आहे.

दक्षिण आफ्रिकेत या दोघांच्या मालिकाचा एक संयुक्त द्राक्षाचा मळा आहे. हा मळा हे दोघं जेव्हा एकत्र होतो तेव्हा त्यांनी २००८ मध्ये विकत घेतला होता. मात्र हे दोघं विभक्त झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचे हिस्से झाले. त्यामध्ये या मळ्याचेही दोन भाग झाले. अँजेलिना हिनं तिच्या मालकीचा द्राक्षाचा मळा रशियातील युरी शेफलर यांची सहाय्यक कंपनी टेन्यूट डेल मोंडेला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विकला. त्यावरून या दोघांमधील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

हे वाचा-‘पृथ्वीराज’ ला विसराल, अक्षय कुमार दिसणार सी शंकरन नायरच्या रुपात

ब्रॅडच्या मते संयुक्त मालकीच्या संपत्तीबाबत एकमेकांच्या संमतीविना आणि एकमेकांचे नुकसान होईल, असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही असं घटस्फोट घेताना अट ठेवली होती. मात्र, अँजेलिनानं याचं उल्लंघन करत हा व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. याच द्राक्षाच्या मळ्यात ब्रॅड आणि अँजेलिना यांचं लग्न झालं होतं.

ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली

ब्रॅड पीटनं केले हे आरोप

पीपल मॅग्जझिननं दिलेल्या वृत्तानुसार, ब्रॅडनं कोर्टात नव्यानं दाखल केलेल्या याचिकेमध्ये असं नमूद केलं आहे की, दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षाच्या मळ्याच्या विक्रीच्या या व्यवहारामुळे आपला विश्वासघात तर झालाच आहे शिवाय नुकसान केल्याचा आरोप केला आहे.

हे वाचा-नयनतारा-विग्नेशच्या लग्नपत्रिकेचा Video Viral; ड्रेस कोड ते मुहूर्तापर्यंतची सर्व माहिती

या याचिकेमध्ये असंही नमूद केले आहे की, मिरावल ब्रॅडचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. परंतु त्या प्रोजेक्टच्या यशस्वी होण्यासाठी अँजेलिनानं काहीही केलेलं नाही. उलट द्राक्षाच्या मळ्यातील तिचा भाग विकल्यामुळे ब्रॅडचं मोठं नुकसान होणार आहे. तिनं शेफलरसह केलेला हा व्यवहार संशयास्पद आणि तिच्या विखारी हेतूचा भाग असल्याचा आरोप ब्रॅडनं केला आहे. दरम्यान, या खटल्यामधील अनेक गोष्टींवर अद्याप सविस्तर आणि अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

२००५ पासून प्रेमकहाणीला प्रारंभ

दरम्यान, हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिट आणि लोकप्रिय अभिनेत्री अँजेलिना जोली यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. मिस्टर अँड मिसेस स्मिथ या २००५ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाच्या सेटवर त्या दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. या दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले आणि सहा मुलांचे पालकही झाले.

ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली

दोन मुलांना अँजेलिनानं ब्रॅडला भेटण्यापूर्वीच दत्तक घेतलं होतं. ब्रॅडनं लग्नानंतर त्या दोघांना अधिकृतपणं दत्तक घेत स्वतःचं नाव दिलं. त्यानंतर त्यानं एका मुलाला दत्तक घेतलं. लग्नानंतर ब्रॅड आणि अँजेलिनाला तीन मुलं झाली. मात्र, हळूहळू या दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्यानं दुरावा आला. त्यामुळे २०१६ मध्ये अँजेलिनानं घटस्फोटासाठी अर्ज केला आणि २०१९ मध्ये हे दोघं विभक्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here