रत्नागिरी : कोकण रेल्वेतून प्रवास करणार्‍या रोहा येथील तरुणाचा मंगळवारी ता. ७ रोजी पहाटेच्या सुमारास खेड तालुक्यातील वेरळ खडकवाडी येथे रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सकाळी ९.४५ ते १० वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅक शेजारी चित्रविचित्र अवस्थेमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा युवक कोणत्या ट्रेनमधून पडला याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये. तो खाली पडल्याचे कोणाच्या लक्षात आले नसावे रात्रीच्या वेळेस झोपेत हा दुर्दैवी अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रोहा येथील मोरे वसाहतीत राहणार विनोद तय्याप्पा क्षीरसागर (वय २७) या तरुणाचे वडील मुंबई येथे उपचारार्थ दवाखान्यात दाखल असून हा तरुण मुंबईतून रोहा असा रेल्वेतून प्रवास करत असावा. मात्र, झोप लागल्याने तो रेल्वेतून कोकण रेल्वे मार्गावर पुढे आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Covid Report: करोनासंदर्भात दिलासादायक बातमी, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याने चिंता मिटवली
खेड तालुक्यातील वेरळ गावानजीक रेल्वेतून एक प्रवासी रेल्वेतून पडल्याचे समजताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, अभिषेक डेरवणकर, पोलीस पाटील संजय शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. प्रसाद गांधी यांच्या रुग्णवाहिकेने मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे त्याची ओळख पटवण्यात आली. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नेण्यात आला. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

पत्रकार म्हणाले तुमच्या उमेदवारीपेक्षा पंकजांची चर्चा जास्त, प्रसाद लाड म्हणाले…

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here