मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra 47th Birthday) आज तिचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं शिल्पानं स्वतःसाठी एक आलिशान व्हॅनिटी व्हॅन विकत घेतली आहे. या व्हॅनिटी व्हॅनचे आतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून सर्वजण आवाक झाले आहेत. कारण या व्हॅनमध्ये सर्वप्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा तर आहेच. शिल्पानं तिच्या योगासनांसाठी खास व्यवस्था देखील या व्हॅनमध्ये केली आहे.

शिल्पा शेट्टी व्हॅनिटी व्हॅन

या आहेत स्पेशल सुविधा
ई टाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पानं स्वैंकी व्हॅनिटी व्हॅन विकत घेतली आहे. त्या व्हॅनमध्ये किचन आहे, केस धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील आहे. या व्हॅनचं वैशिष्ट्य म्हणजे इथं योगा करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. शिल्पा शेट्टी ही फिटनेस फ्रीक आहे आणि तिला योगासनांची प्रचंड आवड आहे. तिची ही आवड लक्षात घेऊन त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

ड्रेसिंग टेबल ते आलिशान लाउंज

शिल्पा शेट्टी हिची आलिशान व्हॅनिटी व्हॅन

व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रेसिंग टेबल देखील आहे. तिथं बसून अभिनेत्री शूटिंगला जायच्या आधी ती तयारी करू शकेल. व्हॅनिटी व्हॅनमध्ये लाउंज एरिआ देखील आहे. तिथं बसून आराम करता येईल.

शिल्पा शेट्टी हिची आलिशान व्हॅनिटी व्हॅन

शिल्पा शेट्टी हिची आलिशान व्हॅनिटी व्हॅन

शिल्पा शेट्टी हिची आलिशान व्हॅनिटी व्हॅन

बाजीगर सिनेमातून केलं होतं पदार्पण

शिल्पा शेट्टीनं ९० च्या दशकामध्ये अभिनयाच्या विश्वात पदार्पण केलं होतं. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीगर’ (Baazigar) सिनेमातून अभिनय करायला सुरुवात केली. शिल्पा शेट्टीनं २९ वर्षांच्या करीअरमध्ये ‘धड़कन’, ‘रिश्ते, ‘इंडियन’, ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ यांसारख्या सिनेमांत काम केलं आहे. ४७ व्या वर्षातही शिल्पाचा फिटनेस आणि तिचा जलवा कायम आहे. तिचे लुक्स, तिचं सौंदर्य आजही नव्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

शिल्पा शेट्टीची संपत्ती

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीकडे आलिशान गाड्या, बंगले आहेत. रिपोर्ट्सनुसार २०२१ मध्ये शिल्पाची एकूण संपत्ती १३४ कोटी आहे. दुबईमध्ये शिल्पाचं आलिशान घर आहे. हे घर तिला राज कुंद्रा यानं भेट म्हणून दिलं आहे. शिल्पाच्या अपकमिंग सिनेमांबाबत सांगायचं तर ती ‘निकम्मा’, ‘सुखी’ या सिनेमांत ती दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here