बल्हारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील शेतकरी सुधाकर उद्धव पोडे (वय ५५) यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. सध्या मान्सूनपूर्व शेतीची मशागत करण्याची लगबग सूरू आहे. आज बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेतात मशागत करण्यासाठी सुधाकर आणि त्यांच्या पत्नी बैलगाडीने शेतात गेले. सूधाकर पोडे यांनी शेतात नांगरणी केली. नांगरणीत गोळा झालेल्या कपाशीचा जमा झालेला पुंजने जाळत होते.
काठीने पुंजने जाळत असताना हवेच्या झोक्याने आगीचा लोळ त्याच्या अंगावर आला. यात डोक्यापासून कंबरेपर्यंत सूधाकर पोडे यांच शरीर झळालं. लगतच्या शेतात मशागत करीत असलेली पत्नी हे दिसताचं धावून आली. मात्र, तोपर्यंत सूधाकर यांची प्राणज्योत मावळली होती. या दुदैवी घटनेची माहिती गावात पोहचताच गावावर शोककळा पसरली.