मुंबई : “शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा ठाकरे सरकारमधील मंत्री सुभाष देसाई आणि ज्येष्ठ नेते दिवाकर रावते हे शिवेसेनचे पहिल्या फळीतील नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे शिवसेना वाढीसाठी पणाला लावलं. मराठीचा लढा असेल, हिंदुत्वाचा लढा असेल, मराठीचे अनेक प्रश्न असतील, उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून या दोन्ही नेत्यांनी काम केलंय. पण आता या दोन्ही नेत्यांनी तरुणांना संधी मिळावी म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला आहे”, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेचे पहिल्या फळीतील सैनिक, ज्येष्ठ नेते आता विधिमंडळात दिसणार नाही, या कल्पनेने राऊतांचा गळा दाटला.

शिवसेनेने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही धक्कातंत्र वापरलं आहे. सेनेने नव्या दमाच्या सचिन अहिर आणि नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपसूकच ज्येष्ठ सेना नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री सुभाष देसाई यांचा पत्ता कट झाला आहे. परंतु तरुणांना संधी मिळावी म्हणून त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्यसभेची हंडी फुटली, अबू आझमींची नाराजी मिटली, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मविआला पाठिंबा
संजय राऊत काय म्हणाले?

“सुभाष देसाई आणि ज्येष्ठ नेते दिवाकर रावते हे शिवेसेनचे पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते आहेत. दोघेही बाळासाहेबांचे कट्टर सैनिक आहेत. या दोन्ही नेत्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे शिवसेना वाढीसाठी पणाला लावलं. मराठीचा लढा असेल, हिंदुत्वाचा लढा असेल, मराठीचे अनेक प्रश्न असतील, उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून या दोन्ही नेत्यांनी काम केलंय. पण आता दोघांनीही तरुणांना संधी मिळावी म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला आहे”, असं राऊत म्हणाले.

MLC: गोपीनाथरावांची निष्ठावान कार्यकर्ती, भाजप महिला आघाडीची तोफ, उमा खापरेंना लॉटरी
आमशा पाडवी आणि सचिन अहिर यांना उमेदवारी

आमशा पाडवी यांना संधी दिल्याने शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. तर सचिन अहिर यांच्यामुळे आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातील विजय सुकर झाला होता. त्याची परतफेड आता शिवसेनेकडून केली गेली आहे. आमशा पाडवी आणि सचिन अहिर यांना विधानपरिषदेवर पाठवले गेल्याने सुभाष देसाई यांना आमदारकीसोबत मंत्रिपदावरही पाणी सोडावे लागणार आहे. त्यानुसार येत्या सहा महिन्यांमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. सुभाष देसाई यांच्यानंतर उद्योग खात्याचा कारभार सचिन अहिर यांच्याकडे जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here