मुंबई: मालिका आणि सणसमारंभ हे समीकरण अनेकदा चाहत्यांच्या आवडीचं ठरणारं असतं. प्रेक्षक अनेकदा अशा एपिसोडमध्ये गुंतला जातो. दरम्यान तुमच्या काही आवडीच्या मालिकांमधील नायिका लवकरच वटपौर्णिमेचा सण साजरा करताना दिसतील. हा सण साजरा करताना ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Majha Guntala Latest Episode) या मालिकेच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये अंतरा (Jeev Majha Guntala Antara) हिरव्या रंगाची नऊवार नेसून पारंपरिक अंदाजात दिसत आहे.

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ (Jeev Majha Guntala Vatpoornima Special Episode) म्हणून साजरा केला जातो. पावसाळा सुरू झाला ही महिलामंडळाला या सणाची आतुरता लागून राहते. खरंतर या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. वटपौर्णिमेच्या सणादिवशी वडाच्या झाडाचं स्त्रिया मोठ्या भक्तिभावाने पूजन करतात. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या व्रताला सर्व सुवासिनींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे.

हे वाचा-टीव्हीचा मामलाआई शूटिंगमध्ये बिझी असताना अभ्यास करताना दिसली जिजा, खूपच खास आहे हा व्हिडिओ

कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमध्ये अंतराची पहिली वटपौर्णिमा असून खानविलकर कुटुंब मोठ्या उत्साहात ती साजरी करणार आहे. अंतराने यासाठी छान अशी हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, गजरा घातला आहे, पारंपरिक दागदागिने घातले आहेत. अंतराची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने घरात उत्साहाचे वातावरण आहे.

पण या सणसमारंभामध्ये देखील एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खानविलकरांच्या या आनंदात श्वेताचे कारस्थान असणारच आहे. श्वेता मल्हारला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, दुसरीकडे अंतरा चित्रा काकीचा पर्दाफाश करणार आहे. चित्राचं खरं रुप समोर आणण्यासाठी अंतरा काय काय करणार हे या आगामी एपिसोड्समध्ये पाहायला मिळेल. तर श्वेता तिच्या कारस्थानात यशस्वी होईल का की अंतरा तिचा डाव उलटून लावेल हे पाहणेही रंजक ठरेल.

हे वाचा-नयनतारा-विग्नेशच्या लग्नपत्रिकेचा Video Viral; ड्रेस कोड ते मुहूर्तापर्यंतची सर्व माहिती

अंतराचं धमाल फोटोशूट

जीव माझा गुंतला

अंतराचं धमाल फोटोशूट

दरम्यान मालिकेच्या ट्रॅकमध्ये कितीही ट्विस्ट अँड टर्न्स सुरू असले तरी सेटवर अंतराची भूमिका करणाऱ्या योगिता चव्हाण हिची धमाल सुरू आहे. तिने याठिकाणीही फोटोशूट केले आहे. झोपाळ्यावर बसलेले तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. याशिवाय नऊवारीवर गॉगल लावून फोटो काढण्याचा मोह देखील तिला आवरला नाही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here