इतिहासकार आणि तज्ज्ञ मंडळी सॅन जोस गॅलियन जहाजाला अब्जावधींचा खजिना मानतात. सॅन जोस गॅलियन जहाज १७०८ मध्ये कोलंबियाच्या कार्टाजेना बंदराजवळ बुडालं. २०१५ मध्ये या जहाजाचे अवशेष सापडले. या अवशेषांवर मालकी हक्क कोणाचा यावर अजूनही वाद सुरू आहेत.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात रिमोटनं चालणारं वाहन (आरओव्ही) ९०० मीटर खोल पोहोचलं. तिथे दोन जहाजं आढळून आली. आरओव्हीनं जवळच दोन अवशेष शोधून काढले. यातील एक कोलोनियल बोट असून दुसरी स्कूनर आहे. दोन्ही जहाजं २०० वर्षांपूर्वीची आहेत. स्वातंत्र्यासाठी स्पेनविरुद्ध झालं होतं. ही दोन्ही जहाजं त्या कालखंडातील आहेत.
समुद्राच्या पोटातील अवशेषांचा फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. हे सॅन जोस गॅलियनचे आतापर्यंतचे सर्वोत्तम फोटो मानले जात आहेत. यात सोन्याची बिस्किटं, नाणी दिसून येत आहेत. यासोबतच १६५५ मध्ये तयार करण्यात आलेली एक तोफदेखील आढळून आली आहे. फोटोंमध्ये चिनी क्रॉकरीही दिसत आहे. नौदल आणि पुरातत्त्वतज्ज्ञ या जहाजांबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.