तब्बल २९ ग्रामपंचायतीत १०० टक्के विधवा प्रथा बंदचा ठराव
राज्य शासन आणि महिला आयोगाच्या वतीने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विधवा प्रथा बंद करण्याबाबत आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील तब्बल २९ ग्रामपंचायतीत १०० टक्के विधवा प्रथा बंदचा ठराव करणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विधवा प्रथा बंद करणारा ठराव खडकवासला मतदार संघ हा राज्यातील पहिला मतदार संघ ठरणार आहे.
रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या घरातूनच विधवा प्रथा बंदीची सुरुवात केली
विशेष बाब म्हणजे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या घरातूनच विधवा प्रथा बंदीची सुरुवात केली होती. या कार्यक्रमासाठी यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख देखील उपस्थित राहणार आहेत.