दरम्यान, ‘सत्ता गेल्याने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पाण्यासाठी तो मोर्चा नव्हता. आमच्या आधी त्यांची सत्ता होती, त्यांनी का निधी दिला नाही’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ‘आम्ही अनेक गोष्टी करत आहोत. संभाजीनगरच्या रस्त्यांसाठी निधी देत आहोत. गेल्या अडीच वर्षांपासून काम करत आहोत. औरंगाबादमध्ये मेट्रोची गरज लागली तर त्याचा प्लॅन बनवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. शहराचं विद्रुपीकरण करणारी मेट्रो नसेल तसेचं संभाजीनगरची शान वाढवणाऱ्या गोष्टी करु’, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
मेट्रो रेल्वेचा प्रकल्प औरंगाबादमध्ये आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील
‘मेट्रो रेल्वेचा प्रकल्प औरंगाबादमध्ये आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून त्याचा आराखडा बनवण्याचं काम महापालिकेनं सुरू केल्याची माहितीही सुभाष देसाई यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका मोठ्या कंपनीने औरंगाबादमध्ये गुंतवणूक करावी यासाठी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील आहेत’, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.