शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेआधी कट्टर शिवसैनिक अंकुश पवार यांचा सत्कार केला. ६ कोटी ७५ लाख वेळा रामनाम लिहिणाऱ्या पवार यांच्यासमोर मुख्यमंत्री आदरानं झुकले. पक्षप्रमुखांना झुकलेलं पाहून पवारदेखील गहिवरले.

 

cm uddhav thackeray felicitates shiv sena worker
मुख्यमंत्री ठाकरेंकडून कट्टर शिवसैनिकाचा सन्मान

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री ठाकरेंकडून कट्टर शिवसैनिकाचा सन्मान
  • अंकुश पवार यांचा ठाकरेंकडून सन्मान
  • शिवसैनिकासमोर ठाकरे आदरानं झुकले
औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील जाहीर सभेतून भाजपला लक्ष्य केलं आहे. हिंदुत्व, काश्मिरी पंडितांवर होणारे दहशतवादी हल्ला, हनुमान चालिसा, औरंगाबादच्या नामांतरावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. सभा सुरू होण्यापूर्वी उद्धव यांनी एका कट्टर शिवसैनिकाचा सत्कार केला. या कट्टर शिवसैनिकासमोर ठाकरे आदरानं झुकले.

उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी अंकुश पवार नावाचा शिवसैनिक आज सकाळी ६० किलोमीटर अंतर पायी कापून औरंगाबादमध्ये दाखल झाला. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रवास अनवाणी केला. जालन्यातील पांगरीतून अंकुश पवार औरंगाबादच्या सभेसाठी पायी पोहोचले.
सत्ता गेल्यानं जल आक्रोश मोर्चा, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
अंकुश पवार यांनी ६ कोटी ७५ लाख वेळी ‘राम नाम’ जप केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी हा नवस केला. तब्बल ६ कोटी ७५ लाख वेळा रामनाम लिहिलेलं कागद पवार यांनी ठाकरेंना दिले. यानंतर ठाकरे अंकुश पवार यांच्यासमोर आदरानं झुकले. आपल्या पक्षप्रमुखांनी दिलेला हा सन्मान पाहून पवारदेखील गहिवरले.
‘उद्धवजी बोलतात ते करतातच, नारायण राणेंनाही सोडलं नाही, तुरुंगाची हवा खायला लावली’
गेल्या ९ वर्षांपासून अंकुश पवार यांनी उद्धव ठाकरेंसाठी रामनामाचा नवस केला.गेले दोन वर्ष करोना असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेता आली नाही. परंतु आता या सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री भेटल्यानं पवार यांनी आनंद व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे आयुष्यभर मुख्यमंत्री रहावे अशी इच्छा पवार यांनी बोलून दाखवली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : cm uddhav thackeray felicitates shiv sena worker ankush pawar who wrote ram nam for 6 crore 75 lakh times
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here