रत्नागिरी : कोकणात राजापूर येथील रिफायनरी विरोधी संघटनेने घटनास्थळी जाऊन पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत काम रोखण्यात आले आहे. आपल्या माता-भगिनी आपल्या मातृभूमीला वाचविण्यासाठी आम्ही विरोध करत आहोत, नुसता विरोधाला विरोध ही आमची भूमिका नाही, मायभुमी वाचवाल तर आम्ही वाचु अशी भूमिका आमची असल्याची माहिती रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकारी नरेंद्र जोशी यांनी दिली. आता ‘एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प पूर्णपणे रद्द’ पाऊसही सुरू आहे त्यातही हा विरोध सुरु आहे.

पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर पोलीस उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पण सरकारचा निषेध म्हणून रात्रभर मोठा जमाव आहे. आमच्या जमिनी आहेत त्या आम्ही राखण करू रात्रभर असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. उद्या सकाळी एमआयडीसी अधिकारी येणार आहेत, त्यांनतर पुढिल भूमिका घेतली जाईल. सगळं बेकायदेशीर चालू आहे, आमचा रिफायनरीला विरोध ठाम आहे, अशी भूमिका सत्यजीत चव्हाण यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना मांडली.

जे जलील बोलत होते, तेच आज उद्धव ठाकरे बोलले, नामांतरावर सेना-MIM चा सुरात सूर?
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक येईपर्यंत घेराव कायम ठेवायचा निर्धार अशी भूमिका विरोधकांनी भर पावसात घेतली आहे. पावसात दडपशाही विरोधी आंदोलन सुरूच आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी विरोधात शिवणे खुर्द, येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. आज पुन्हा एकदा रिफायनरीच काम ग्रामस्थांनी रोखलं आहे. रिफायनरीच्या कामगारांना घेरत कष्टकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या सरकारचा निषेध त्यांनी केला.
गळ्यात भगवं उपरणं, तेजस ठाकरेंची एन्ट्री, औरंगाबादेत शिवसेनेच्या ‘छाव्या’चं लाँचिंग?
कालच्या कलेक्टरांच्या भेटीत त्यांनी कुठलीही परवानगी दिली नसल्याचे कमिटीला कळवले आहे. असे असतानाही हे लोक कोणाच्या परवानगीने आले? असा सवाल रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता या सगळ्या रिफायनरी विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता रिफायनरी बाबत राज्य शासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचं ठरेल.

औरंगाबादेत जाऊन ना जलील निशाण्यावर, ना ओवेसींचा समाचार, राज्यसभेमुळे मुख्यमंत्री सौम्य?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here