अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी नक्की मिळणार, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना उमेदवारी मिळालीच नाही. त्यामुळे ठिकठिकाणच्या त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. पाथर्डीत मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्याचं नियोजन कार्यकर्त्यांनी केलं होतं. मात्र, ते फटाके तसेच राहून गेले. आता या नाराजीला स्वत: मुंडे आणि त्यांचे समर्थक कशी वाट मोकळी करून देतात, याकडे लक्ष लागले आहे.

असं असलं तरी पुढील विधानसभेसाठी वेगळी खेळी खेळण्यासाठी पंकजा यांना मागे ठेवलं असावं, असाही पाथर्डीतील कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. बीड जिल्ह्यालगत असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मुंडे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यावरही या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठे प्रेम केले. त्यामुळे ते पाथर्डी मतदारसंघाला आपली मावशी म्हणत. तोच वारसा पंकजा यांनी पुढे सुरू ठेवला. गावोगावी त्यांचे समर्थक आहेत. स्थानिक पातळीवर वेगळे राजकारण असले तरी मुंडे यांच्यासाठी ते एकत्र येतात, असा अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी मुंडे यांचे भगवानगडाशी मतभेद झाले, त्यावेळी पाथर्डीच्या समर्थकांनीच त्यांना साथ दिली होती.

Weather Alert : राज्यावर अस्मानी संकट, मेघगर्जनेसह तब्बल २७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विजयातही मुंडेचा मोठा वाटा आहे. मागील विधानसभेला जेव्हा मुंडे यांचा पराभव झाला तर इकडे राजळे विजयी झाल्या तेव्हा राजळे यांनी आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करू दिला नव्हता. तेव्हापासून मुंडे यांचे पुनर्वसन होणार याची चर्चा सुरू होती.

याआधीही एकदा त्यांना डावललं गेलं. त्यावरून नाराजी झाली. मात्र, पुन्हा मुंडे पक्षात सक्रीय झाल्या. या सर्व प्रक्रियेत पाथर्डीचे कार्यकर्ते त्यांच्यासमवेत होते. अलीकडे मुंडे यांनाही विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अशी खात्री वाटू लागली होती. तशी सूचक विधाने त्यांनी केली होती. तर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही सोशल मीडिच्या माध्यमातून याला दुजोरा दिला होता. त्यामुळे यावेळी पंकजा यांना उमेदवारी मिळणारच, अशी कार्यकर्त्यांनाही खात्री वाटू लागली होती. त्यामुळे मागील वेळी राहून गेलेला जल्लोष करण्याची तयारी करण्यात आली होती.

१२ वी पास पण आयुष्याच्या परीक्षेत नापास, निकालानंतर पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाथर्डीत फटाके फोडून जल्लोष करण्याचे कार्यकर्त्यांचे नियोजन होते. प्रत्यक्षात मात्र याही वेळी मुंडे यांना डावलले गेल्याची बातमी आली आणि सर्वांचीच निराशा झाली. फटाके फोडणेही राहून गेले. आता कार्यकर्ते पक्षाविरोधात पक्षातील काही नेत्यांविरूद्ध नाराजी व्यक्त करू लागले आहेत. स्वत: मुंडे यांनी अद्याप काहीही भूमिका घेतलेली नाही. त्याची कार्यकर्त्यांनाही प्रतीक्षा आहे.

ही भाजपची राजकीय खेळी असू शकते

काही कार्यकर्त्यांना वाटते की, यामागेही भाजपची राजकीय खेळी असू शकते. विधान सभेला मुंडे यांच्या परळी मतदारसंघात कठीण परिस्थिती असल्याचे दिसून येत असल्याने त्यांना पुढीलवेळी पाथर्डीमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. पाथर्डीत यावेळी राष्ट्रवादीकडून ढाकणे किंवा घुले कुटुंबातील उमेदवार दिला जाऊन त्यामागे पक्षाची ताकद उभी करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे भाजपकडूनही प्रबळ उमेदवार असावा, अशी तयारी पक्षाकडून सुरू असावी, असाही कार्यकर्त्यांना अंदाज आहे.

Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या नावानं आणखी एक अजामीनपात्र वॉरंट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here