मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख चार पक्षांनी बुधवारी आपले उमेदवार जाहीर केले. यावेळी भाजपने जाहीर केलेल्या पाच उमेदवारांमध्ये रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव नसल्याने खोत यांना डावलल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजप सहावा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. भाजपचा पाठिंबा असलेले खोत हे अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

सदाभाऊ खोत हे आज विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये जोरदार चुरस सुरू असताना सदाभाऊ खोत यांनी निवडणूक रिंगणात उडी घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर त्यांच्या विजयासाठी भाजपकडून रसद पुरवली जाण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी आणलेले फटाके फुटलेच नाहीत; मात्र अद्यापही एक आशा जिवंत

दरम्यान, राज्यात भाजपची सत्ता असताना सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातही सहभागी होते. तसंच खोत यांच्या रयत क्रांती संघटनेनं २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला समर्थन दिलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here