भंडारा : बुधवारी राज्यात १२वीचा निकाल घोषित झाल्यावर अनेक विद्यार्थी आनंदी झाले तर काहींना यश न मिळाल्यामुळे पदरी निराशा आली. अशात भंडाऱ्यात एक मन हेलावणारा प्रकार समोर आला आहे. इथे बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने निराश झालेल्या तरुणीने तांदळाला लावायचे विषारी औषध (पावडर) खात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात घडली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मयुरी किशोर वंजारी रा. लाखनी असं मृतक विद्यार्थिनीचं नाव असून शरीरात विषाचं प्रमाण जास्त झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मयुरी ही लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. मोलमजूरी करणाऱ्या आई वडीलांचा भविष्यात आधार बनता यावा हा दृष्टीकोन ठेवून मयुरी वाटचाल करत होती.

१२ वी पास पण आयुष्याच्या परीक्षेत नापास, निकालानंतर पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मयुरीने शिकवणी विना घरीच अभ्यास करून परीक्षा दिली. तिला निकालाची उत्सुकता लागली होती. काल दुपारी निकाल घोषित झाला आणि तिला फक्त ५५ टक्केच गुण मिळाले. निकाल बघून ती प्रचंड निराश झाली. आपण आपल्या आई वडिलांसाठी काहीच करू शकत नाही असा नकारात्मक विचार तिच्यावर हावी झाल्याने तिने स्वता: ला संपविण्याचा निर्णय घेतला.

घरी आल्यावर तिने घरातील तांदळाला अळी लागू नये म्हणून वापरण्यात येणारे औषध (पावडर) सेवन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मयुरीला तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान तिचा भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करत आहेत.

Weather Alert : राज्यावर अस्मानी संकट, मेघगर्जनेसह तब्बल २७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here