Rajyasabha Election 2022 | मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये गुरुवारी भाजप आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी याठिकाणी कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना भाजप आमदारांचा उत्साह वाढणार आहे.

 

हायलाइट्स:

  • देवेंद्र फडणवीस होम क्वारंटाईन होते
  • राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांना घरात बसून राहावे लागले
  • फडणवीस यांचा करोना अहवाल निगेटिव्ह
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या शक्तीप्रदर्शनानंतर भाजपच्या विजयाच्या आशा मावळल्याची चर्चा असतानाच आता पक्षासाठी एक ‘पॉझिटिव्ह’ बातमी समोर आली आहे. राज्यात भाजपच्या जहाजाचे सुकाणू एकहाती हाकणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता राज्यसभा निवडणुकीत भाजपसाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मैदानात उतरु शकणार आहेत. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये गुरुवारी भाजप आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी याठिकाणी कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना भाजप आमदारांचा उत्साह वाढणार आहे. तसेच आता शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस राजकीय चमत्कार करुन राज्यसभा निवडणुकीचे पारडे भाजपच्या बाजूने झुकवणार का, हे पाहावे लागेल. (Rajyasabha Election 2022)
पराभवासाठी रसद, २ वेळा राज्यसभा-विधान परिषदेला हुलकावणी, पंकजा मुंडेंना कोण डावलतंय?
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ट्विट करून त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस होम क्वारंटाईन असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांना घरात बसून राहावे लागल्याने भाजपची गोची झाली होती. मात्र, फडणवीस यांनी घरात बसूनही फोनवरून अपक्ष आमदारांशी बोलणी करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीस करोना नेगेटिव्ह झाल्याने प्रत्यक्ष मैदानात उतरून राज्यसभा निवडणुकीची सारी सूत्रे हलवू शकणार आहेत. ही भाजपसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
मुख्यमंत्र्यांचं १ तासाचं भाषण अन् फडणवीसांचे २ ट्विट, ‘टोमणे सभा’ म्हणत खिल्ली उडवली
फडणवीस यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आल्याने गुरुवारी सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस भाजपच्या नेत्यांना आणि आमदारांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांचा आजवरचा लौकिक पाहता राज्यसभा निवडणुकीपूर्वी एका रात्रीतही राजकीय चमत्कार घडण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : devendra fadnavis corona virus report negative bjp important meeting on sager bunglow before rajyasabha election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here