मुंबई : मराठी टीव्ही विश्वातील अभिनेत्री मीनाक्षी राठोड सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ याचा अनुभव घेत आहेय मीनाक्षीनं गेल्या महिन्यात चिमुकलीला जन्म दिला. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेतेय. हा आनंद ती चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतेय.
बाप झाल्यापासून असं वेड्यासारखा वागतोय…मीनाक्षी राठोडची पोस्ट व्हायरल
‘सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देवकीची भूमिका साकारणाऱ्या मीनाक्षीच्या डोहाळे जेवणापासूनच चाहत्यांना ती आई झाल्याची बातमी कधी देतेय याची उत्सुकता लागली होती. मीनाक्षीनं गेल्या मुलीला जन्म दिला असून ‘मुलगी झाली हो’, अशा शब्दात तिने हा आनंद सोशल मीडियावर साजरा केला होता. मीनाक्षीनं नुकतेच तिच्या लेकीचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.


मीनाक्षीनं हे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे.


मीनाक्षीचा पती आणि बाळाचा बाबा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. कैलास वाघमारे याला देखील त्याची लेक आयुष्यात आल्यापासून जग ठेंगणं वाटू लागलं आहे. या फोटोंवरून ते दिसून येतंय. मीनाक्षी आणि पती कैलास हा आनंद सोशल मीडियावर व्यक्त करतना दिसतात.

कैलासच्या वाढदिवसानिमित्त मीनाक्षीनं शेअर केलेली पोस्ट देखील चर्चेत होती.

काय होती मीनाक्षीची ही पोस्ट?
बाळाला जन्म दिल्यानतंर आईचा दूसरा जन्म होतो असं म्हणतात.पण बाप झाल्यापासून तुझाही दूसरा जन्म झाल्यासारखा वाटतोय. म्हणूनच तर असं वेड्यासारखा वागतोय. मुलीसोबतचा हा नवीन वेडेपणा तुला मुबारक.नवीन जन्म दिवसाच्या खूप खूप सदिच्छा. असं मीनाक्षीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here