मुंबई: बिग बॉसच्या घरात अनेक नाती फुलतात असं बोललं जातं. त्याप्रमाणे प्रत्येक पर्वात जोड्या जुळल्या. त्यापैकी काही नाती पुढच्या टप्प्यात गेली तर काही नात्यांना पूर्णविराम लागला. नुकत्याच झालेल्या पर्वात राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्यातील नात्याविषयी जबरदस्त चर्चा झाली.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर दोघं एकमेकांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसले. त्यामुळे ते त्यांचं नातं पुढच्या टप्प्यात नेतील, असं त्यांच्या चाहत्यांना वाटलं होतं. पण ब्रेकअप झाल्याचं जाहीर करत दोघांनी चाहत्यांना धक्का दिला.
‘दोघांना एकमेकांप्रती आदर आहे, पण आता ते दोघं एकत्र नाहीत’, असं त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं स्पष्ट केलं.
राकेश बापट आणि शमिता शेट्टीच्या लव्बस्टोरीवा बिग बॉस ओटीटी कार्यक्रमातून सुरुवात झाली. राकेशनं या कार्यक्रमात शमिताला प्रमोज केलं होतं. त्यानंतर हे दोघेजण सलमान खानच्या बिग बॉस १५ मध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. परंतु राकेश बापटला किडनी स्टोनचा त्रास होऊ लागल्यानं कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर शमिता शेट्टीला या स्पर्धेत तिस-या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.