Uddhav Thackeray Aurgabad rally | होय, बाबरी पडली तेव्हा औरंगाबादवरुन एक ट्रेन भरून शिवसैनिक अयोध्येला गेले होते, भाजप आमदाराची कबुली. माझे वडील मोरेश्वर सावे हे बाबरी मशीद पडली तेव्हा कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. पण अयोध्येला जाऊन आल्यानंतर माझे वडील सातत्याने प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका मांडत होते. ही गोष्ट शिवसेना नेत्यांना आवडली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांकडून मोरेश्वर सावे यांचे खच्चीकरण करण्यात आले.

 

माझे वडील अयोध्येला गेले होते, पण उद्धव ठाकरेंनी अर्धीच स्टोरी सांगितली
‘माझे वडील अयोध्येला गेले होते, पण उद्धव ठाकरेंनी अर्धीच स्टोरी सांगितली’

हायलाइट्स:

  • शिवसेनेने माझ्या वडिलांना साधं लोकसभेचं तिकीट दिलं नाही
  • उद्धव ठाकरे यांनी शिताफीने टाकलेल्या या डावामुळे फडणवीस कोंडीत सापडेल होते
  • उद्धव ठाकरे यांनी मोरेश्वर सावे अयोध्येला गेल्याचे सांगितले
मुंबई: बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता असा दावा करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्धव ठाकरे यांनी भाजप आमदारालाच पुढे करून कोंडीत पकडले होते. शिवसेनेचे मोरेश्वर सावे १९९२ साली शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते. खरं वाटत नसेल तर आता भाजपमध्ये असलेले त्यांचे पुत्र अतुल सावे (Atul Save) यांनाच देवेंद्र फडणवीस यांनी विचारावे. ते तुम्हाला खरं-खोटं सांगतील, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी शिताफीने टाकलेल्या या डावामुळे फडणवीस कोंडीत सापडण्याची शक्यता होती.
गळ्यात भगवं उपरणं, तेजस ठाकरेंची एन्ट्री, औरंगाबादेत शिवसेनेच्या ‘छाव्या’चं लाँचिंग?
या पार्श्वभूमीवर मोरेश्वर सावे यांचे पुत्र अतुल सावे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अतुल सावे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात माझे वडील स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला. माझे वडील मोरेश्वर सावे हे बाबरी मशीद पडली तेव्हा कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. पण अयोध्येला जाऊन आल्यानंतर माझे वडील सातत्याने प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका मांडत होते. ही गोष्ट शिवसेना नेत्यांना आवडली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांकडून मोरेश्वर सावे यांचे खच्चीकरण करण्यात आले. शिवसेनेने माझ्या वडिलांना साधं लोकसभेचं तिकीट दिलं नाही. उद्धव ठाकरे यांनी मोरेश्वर सावे अयोध्येला गेल्याचे सांगितले, पण पूर्ण गोष्ट का सांगितली नाही, हा माझा सवाल आहे. मोरेश्वर सावे यांचा इतकाच अभिमान होता, तर शिवसेनेने त्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट का दिलं नाही, हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारु इच्छितो, असे अतुल सावे यांनी म्हटले. यावर आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
बाबरीच्या मुद्द्यावर भाजप आमदारालाच पुढे करून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनाच खिंडीत गाठलं
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता. मी त्याठिकाणी होतो, मी माझ्या डोळ्यांनी ती परिस्थिती पाहिली आहे, असा दावा करुन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले होते. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबादच्या सभेत फडणवीसांचा हा डाव त्यांच्यावरच उलटवला. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे आता सांगत आहेत की, बाबरी पतनावेळी मी अयोध्येत गेलो होतो. तिकडे एकही शिवसैनिक नव्हता. पण औरंगाबादमधील आमचे मोरेश्वर सावे आणि इतर शिवसैनिक त्यावेळी अयोध्येत होते. मोरेश्वर सावे हे माजी महापौर आणि खासदार आहेत. आता मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव तुमच्याकडे (भाजप) येऊन आमदार झाले आहेत. ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आमदार झाले आहेत. तेव्हा सावे यांनीच देवेंद्र फडणवीस यांना सांगावे की, माझे बाबा अयोध्येला गेले होते की नव्हते. सावे ज्या फडणवीसांची पालखी वाहत आहेत त्यांच्यासमोर खरं-खोटं करावं. मोरेश्वर सावे त्यावेळी अयोध्येला गेले नसतील तर त्यांच्या चिरंजीवांनी सरळ सांगून टाकावे की, माझे बाबा अयोध्येला गेले नव्हते. हा मुद्दा उपस्थित करून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे या दोघांनाही चांगलेच पेचात पकडले होते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून 6 कोटी 75 लाख वेळा लिहलं होतं ‘राम-नाम’

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp mla atul save hits back at cm uddhav thackeray over babri masjid claim
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here