मुंबई : राज्यात सगळ्यांना मान्सूनची प्रतिक्षा असताना आता हवामान खात्याकडून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भागात मान्सून पुढे सरकरण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.



IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २ दिवसांमध्ये महाराष्ट्र, संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा अधिक भाग आणि पश्चिम बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असून यावेळी ढगाळ वातावरण असेल. तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळला असल्यामुळे राज्यात पावसाचे आगमन उशिरा होत आहे. पण अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला. पण तोही हवा तसा झाला नाही. आज हवामान खात्याकडून राज्यातील २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Weather Alert : राज्यावर अस्मानी संकट, मेघगर्जनेसह तब्बल २७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पण उद्यापासून या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.

१२ वी पास होऊनही तरुणीने विष घेत जीवन संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here