सोलापूर : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी एटीएम मशीन फोडत मोठी रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. मोहोळ पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन एटीएम मशीनमधून तसंच कुरूल येथेही तीन एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल ४९ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरी करण्यात आला आहे.

मोहोळ शहरालगत असलेल्या लोकसेवा हॉटेलजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. अज्ञात ४ चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून या एटीममध्ये प्रवेश करत सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला. तसंच अवघ्या १५ मिनिटात गॅस कटरच्या साहाय्याने मशीन तोडून २६ लाख २८ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारला. दुसरीकडे कुरुल शाखेजवळीलही एटीएम मशीन चोरड्यांनी फोडले आणि त्यातील २२ लाख ९९ हजार रुपये चोरून नेले. याबाबतची फिर्याद एटीएम मशीनचे रिजनल मॅनेजर अमोल पवार यांनी कामती पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

नव्या कारने देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; वडील-चुलते ठार; आईसह मुलगा गंभीर

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर खारगे हे मोहोळ येथील चोरीचा तर कुरुल येथील चोरीचा तपास कामती पोलीस ठाण्याचे एपीआय अंकुश माने हे करत आहे .

चोरट्यांचा अजब फंडा

एटीएम मशीनमधून पैशांची चोरी करताना पकडले जाऊ नये म्हणून चोरट्यांना शक्कल लढवल्याचं पाहायला मिळालं. आरोपींनी तोंडाला फडके बांधून एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर रासायनिक हिरव्या रंगाचा फवारा मारून कॅमेरा बंद पाडण्यात आले. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.

हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभी होती, नंतर बघितलं तर गाडीच गायब, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here