पूजेच्या नावाखाली एका भोंदूबाबाने युवतीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली आहे. युवतीची प्रकृती दोन महिन्यांपासून बरी नाहीए.

 

bhondu baba arrested for rape on girl

पूजेच्या नावावर अत्याचार; युवतीला नदीत आंघोळ करण्यास सांगून… ( file photo )

म. टा. वृत्तसेवा, गोंदिया ः कालसर्प असल्याने पूजा करून देण्याच्या नावावर २१ वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी भोंदूबाबा दिगांबर राजेंद्रप्रसाद तिवारी (७२) रा. एकोडी याला अटक केली आहे. या घटनेतील अत्याचारग्रस्त युवतीची दोन महिन्यांपासून प्रकृती बरी नसल्याने आईवडिलांनी तिला तिवारी याच्याकडे नेले. युवतीला कालसर्प असल्याने पूजा करावी लागणार असे त्याने सांगितले. शनिवारी कवलेवाडा घाटावर बोलविले. तिवारीने आईवडिलांना वेगळे ठेवून युवतीला नदीत आंघोळ करण्यास सांगून अत्याचार केला. युवतीने तिरोडा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंद करून तिवारीला अटक केली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे करीत आहेत.

विश्वासाने लेकराला सांभाळायला दिले; पण तिनेच केला घात, गोंदियात खळबळ उडवणारी घटना

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bhondu baba arrested for rape on girl
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here