Vidhan parishad Election 2022 | विधानपरिषदेच्या पाचव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत रंगणार आहे. प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे प्रसाद लाड यांना निवडून आणणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. भाई जगताप यांना किमान १० ते १२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. याचाच अर्थ विधान परिषदेतील चुरस ही जगताप विरुद्ध लाड अशीच होणार आहे.

 

Prasad Lad Sharad Pawar
प्रसाद लाड आणि शरद पवार

हायलाइट्स:

  • प्रसाद लाड यांचे सर्वपक्षीय मधूर संबंध आहेत.
  • पाचव्या जागेवरून निवडून येण्यासाठी त्यांना मतांची बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे
  • त्यांच्यासमोर काँग्रेसच्या भाई जगताप यांचे कडवे आव्हान असेल
मुंबई: महाराष्ट्रात राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीची लढत रंगणार आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून आपापले उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. एकूण १० जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार यापैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार सहजपणे निवडून येतील. मात्र, भाजपने पाचव्या जागेवरून प्रसाद लाड (Prasad Lad) आणि सहाव्या जागेवरून अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवून या निवडणुकीची रंगत वाढवली आहे.(VidhanParishad Election 2022)

विधानपरिषदेतील या लढतीच्यानिमित्ताने प्रसाद लाड यांच्याबाबत घडलेला एक किस्सा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. प्रसाद लाड यांचे सर्वपक्षीय मधूर संबंध असले तरी पाचव्या जागेवरून निवडून येण्यासाठी त्यांना मतांची बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या भाई जगताप यांचे कडवे आव्हान असेल. जगताप यांना तिसऱ्यांदा विधान परिषदेची उमेदवारी मिळत आहे. २७ मतांच्या कोट्याचा विचार करता काँग्रेसचा पहिला उमेदवार म्हणजे चंद्रकांत हांडोरे हे अगदी सहज निवडून येतील. मात्र, भाई जगताप यांना किमान १० ते १२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. याचाच अर्थ विधान परिषदेतील चुरस ही जगताप विरुद्ध लाड अशीच होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास, भाजपसाठी ‘पॉझिटिव्ह’ बातमी; हुकमी एक्का आता मैदानात उतरणार
जगताप यांना तिसऱ्यांदा विधान परिषदेची उमेदवारी मिळत आहे. २७ मतांच्या कोट्याचा विचार करता काँग्रेसचा पहिला उमेदवार म्हणजे चंद्रकांत हांडोरे हे अगदी सहज निवडून येतील. मात्र, भाई जगताप यांना किमान १० ते १२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. याचाच अर्थ विधान परिषदेतील चुरस ही जगताप विरुद्ध लाड अशीच होणार आहे.
Rajyasabha Election 2022: ‘फोनवर बोलताना काळजी घ्या , मुंबईबाहेर जाऊ नका’; भाजपकडून आमदारांना सूचना
यापूर्वीही मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या जागेवर या दोघांमध्ये अशीच लढत पाहायला मिळाली होती. तेव्हा प्रसाद लाड हे अपक्ष लढले होते. तेव्हा लाड यांना राष्ट्रवादीतील एका गटाचा आतून पाठिंबा होता. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत लक्ष घालून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना तंबी दिल्याने लाड यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतरच प्रसाद लाड यांनी तत्काळ भाजपची वाट धरली होती. या निवडणुकीत जर लाड यांचा पराभव झाला तर तो एका अर्थाने फडणवीस यांच्या जिव्हारी लागणाराच असेल. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिग्गज नेते लाड यांच्याबाबत प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. मात्र, राष्ट्रवादीतील अनेक मंत्र्यांशी सुमधूर संबंध असल्यामुळे प्रसाद लाड या निवडणुकीत राजकीय चमत्कार करुन दाखवणार का, हे आता पाहावे लागेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp prasad lad defeated in vidhan parishad election 2022 in last election due to ncp chief sharad pawar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here