पुणे : हवामान खात्याने दिलेल्या नव्या माहितीनुसार, पुढच्या ४८ तासांमध्ये महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांतच राज्यात मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. अशात हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार गेल्या २४ तासांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस राज्यात पडला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणचा काही भागातही पावसाने हजेरी लावली. मुंबई शहरात रात्री उशिरा हलका पाऊस झाला. पुण्यात आज सकाळ ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली. दरम्यान, हिंगोलीतही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.

Monsoon Arrival 2022 : पुढच्या ४८ तासांत महाराष्ट्रात बरसणार मान्सून?, IMD कडून आनंदाची बातमी
हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील कुरुंदा आणि परिसराला बुधवारी (८ जून) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने चांगलाच तडाखा दिला असून वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, घरावरील पत्रे उडून गेल्याने गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

उस्मानाबाद जिल्ह्यातही रात्री सर्वत्र पाऊस झाला असून मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात झाडं उन्मळून पडली तर काही भागातील घरावरील पत्रे उडून पडली तर या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून पेरणीला वेग येणार आहे.

उस्मानाबादसह परंडा, तुळजापुर, उमरगा, कळंब तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोकणातही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत १३७ मिमी पाऊस झाला. यामध्ये संगमेश्वर ६०, लांजा ५२ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे.

Weather Alert : राज्यावर अस्मानी संकट, मेघगर्जनेसह तब्बल २७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
चंद्रपुरात मात्र विचित्र हवामान पाहायला मिळालं. चंद्रपुरातील ब्रम्हपुरीत तापमान ४६.२ अंश सेल्सियस होतं. त्या पाठोपाठ चंद्रपूर ४५.२ होतं. दिवसभर जिल्ह्यातील काही भागात लाहीलाही करणारं तापमान होतं तर काही भागात सकाळपासून वादळी नाही मात्र थोळंफार ढगाळ वातावरण अन् मध्यम स्वरूपातील हवेचा जोर होता

दरम्यान, आज सकाळी नवी मुंबईत नेरुळ परिसरात जोरदार पाऊस पडला. डोंबिवलीतही हलक्या पावसाच्या सरी पडल्याने उष्णता वाढली आहे. तर सातारा शहरातदेखील ढगाळ वातावरण आहे. तर नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.

नितीन गडकरींनी ५ दिवसांत बांधला राष्ट्रीय महामार्ग, थेट गिनिज बुकमध्ये नाव; PHOTO पाहाच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here