२ जूनला पहाटे झाली होती घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जूनला पहाटे साडेतीनच्या सुमारास तानाबाई येळवंडे या मोई ते निघोजे रस्त्याने पायी चालत मॉर्निंग वॉक करत होत्या. निघोजे बाजूकडे जाऊन पुन्हा मोईला येत असताना त्यांच्या पाठीमागून पायी चालत आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तानाबाई यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाची सोन्याची माळ जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चारीमध्ये टाकून देऊन अपघात झाल्याचा भासविण्याचा प्रयत्न केला.
३३ सीसीटीव्ही फुटेजची केली होती पाहणी
दरम्यान, पोलिसांनी या घटनेत ३३ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यासाठी तीन पथके देखील तयार करण्यात आली होती. रात्री कामावर जाणाऱ्या कामगारांकडे याबाबत चौकशी केली. त्यानंतर आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.