मिरजेतील शिवभोजन थाळी केंद्रावर नशेखोर तरूणांचा राडा
मिरजेतील एसटी स्टँडजवळ असणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रामध्ये दोघं नशेखोर तरुणांकडून राडा करण्यात आला आहे. केंद्रामध्ये बसून जेवण करण्याची वेळ संपल्याने महिला कर्मचाऱ्याने संबंधीत नशेखोर तरुणांना बसून जेवण्यास नकार दिला. त्यानंतर दोघा तरुणांनी वाद घालण्यास सुरूवात केली. महिला कर्मचाऱ्याने पार्सल घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र, बसून जेवण्यावर ठाम राहत जोराने वाद घालण्यास सुरवात करत शिवीगाळ सुरू केली.
शिवभोजन केंद्रातील फलक बोर्ड पाडला
यातून एका नशेखोर तरुणाने लाथा घालून शिवभोजन केंद्रातील फलक बोर्ड पाडला. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याशी अत्यंत उद्धट वर्तन करत शिविगाळ करत जेवण घेण्यास येणाऱ्या ग्राहकांना हाकलून लावले. तरुणांच्या राड्याचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची नोंद मिरज शहर पोलीसांकडे दाखल झाली आहे.