राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. ही जागा जिंकण्यासाठी अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेनेचा दुसरा आणि मविआचा चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी वेगळीच खेळी करत असल्याचं दिसत आहे.

 

rajya election 2022 mim might support mva
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची स्मार्ट खेळी

हायलाइट्स:

  • राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस
  • एमआयएमची दोन मतं मविआला मिळण्याची दाट शक्यता
  • शिवसेनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची स्मार्ट खेळी
मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी शिनसेना आणि भाजपनं उमेदवार दिले आहेत. ही जागा निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आपले आमदार फुटू नयेत म्हणून दोन्ही पक्षांनी हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलं आहे. सोबतच लहान पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेना, भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

लहान पक्षांना गळाला लावण्याचे प्रयत्न
एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. पाठिंबा मागायचाच असेल, तर तो उघडपणे मागा. आमच्या मतदारसंघातील विकासकामं होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली आहे. त्यामुळे एमआयएम मविआला मदत करेल असं दिसत आहे.
राज्यसभा निवडणुकीचे गणित बदलले, आकडे फिरले; कोर्टाच्या निर्णयाचा मविआला फायदा?
एमआयएमची मतं काँग्रेस, राष्ट्रवादीला; त्यांची मतं सेनेला
एमआयएम आणि शिवसेना यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे एमआयएमचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा मिळणं कठीण आहे. त्यामुळे एमआयएमची दोन मतं काँग्रेस, राष्ट्रवादीला मिळतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करेल, असा तोडगा निघत असल्याचं दिसत आहे. एमआयएमचा पाठिंबा मिळवण्यासाठी एक पत्रक काढलं जाईल. त्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव असेल. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं नाव नसेल. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची अडचण होणार नाही.
यादी घेऊन वर्षावर या! मुख्यमंत्र्यांचा अपक्ष आमदारांना मेसेज; भाजपला धक्का?
अपक्षांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू
तुमच्या मतदासंघातील कामांची यादी घेऊन वर्षावर या, असा मेसेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अपक्ष आमदारांना देण्यात आला आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री अपक्ष आमदारांची मतं आपल्या बाजूनं करून घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अपक्षांची मतं भाजपकडे जाऊ नयेत यासाठी शिवसेनेनं व्यूहरचना आखली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेसेजनंतर किती अपक्ष आमदार वर्षावर कामांची यादी घेऊन जातात, ते पाहणं महत्त्वाचं असेल.

पाठिंबा हवा असेल तर मदत मागा, ओवेसींची ऑफर; शिवसेना काय निर्णय घेणार?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : rajya election 2022 mim might support mva likely to vote for ncp and congress candidate
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here