कर्जदारांनी बँकेचे कर्ज भरून आम्हाला या प्रकरणातून मुक्त करावे
कर्जदारांनी बँकेचे कर्ज भरून आम्हाला या प्रकरणातून मुक्त करावे. मुख्याध्यापकांनी आमची पगार कपात थांबवून कपात केलेली रक्कम परत द्यावी. मुख्याध्यापकांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, बँकेने कर्जदारांकडून कर्जाची वसुली करावी, आम्हाला सहकर्जदार या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा त्यांच्या मागण्या आहेत.
त्यांनी तक्रार केली आहे की, शिरापूरच्या अभिनव विद्यालयाचे संस्थापक मधुकर उचाळे यांनी आपले भागीदार रावसाहेब चेमटे व राजेंद्र बाचकर यांनी दूध डेअरीसाठी ३० लाख रुपये कर्ज शिरूरच्या जिजामाता सहकारी महिला बँकेकडून घेतले आहे. या कर्जासाठी मुख्याध्यपकाच्या सहकाऱ्याने या दोन शिक्षकांना जामीनदार केले. त्यासाठी त्यांच्या पगाराचे दाखल परस्पर बँकेत जमा करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या काळात हा प्रकार झाला तेव्हा संस्थेना मान्यताही नव्हती. तरीही बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. पुढे जेव्हा कर्ज थकले तेव्हा या दोन शिक्षकांना नोटिसा आल्या. त्यांच्या पगारातून कर्ज वसुली सुरू झाली.
तुम्ही काळजी करू नका, मी कर्ज भरतो
हा संपूर्ण प्रकार संस्थाचालकांना सांगितल्यावर त्यांनी तुम्ही काळजी करू नका, मी कर्ज भरतो असे आश्वासन दिले. मात्र, वसुली सुरू झाली. पुढे त्या संस्थाचालकांनी कर्जापोटी तारण असलेली मालमत्ता दुसऱ्यांना विकली. त्यानंतर बँकेने ३ वर्षे काहीच केले नाही. मात्र, २०१९ पासून पुन्हा शिनारे व कनिंगध्वज यांच्या पगारातून रुपये २२ हजार रुपये कपात करण्याचा आदेश काढला. मुख्याध्यापक कैलास साठे यांनी कोणतीही शहानिशा न करता व पगार कपात सुरू केली. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होऊ लागले.
शिक्षकांचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण
गेल्या ३ वर्षापासून हे दोघे सहशिक्षक तीनही कर्जदारांकडे कर्ज भरण्यासाठी गयावया करत आहेत. मात्र, त्यांना उलट उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शिक्षक आणि कुटुंब देखील प्रचंड मानसिक तणावात आहेत. या परिस्थितीत आमचे व आमच्या कुटुंबीयांपैकी कोणाचेही काही बरेवाईट झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी कर्जदार, बँक व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्यावर राहील असे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या शिक्षकांनी उपोषण सुरू केले आहे.