ग्रामसेवकाच्या छळामुळे पोलीस संरक्षणाची मागणी
शहीद ऋषीकेश यांच्या कुटुंबीयांनी ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी यांच्याकडून होत असलेल्या छळामुळे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना शहीद ऋषीकेश यांचे वडील रामचंद्र हरी जोंधळे तसेच आई कविता रामचंद्र जोंधळे यांनी पत्र लिहून ग्रामसेवक डवरींपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांनी या पत्राची प्रत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनाही पाठवली आहे.
‘तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले होते’
‘तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले होते’. ज्या तिरंग्यातून मुलाचे पार्थिव आले तो तिरंगा सुद्धा बळजबरीने काढायला लावल्याचा आरोप वीर माता पित्यांनी केला आहे. गावामध्ये बदनामीकारक बॅनर उभे करून कुटुबांची बदनामी केल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ग्रामसेवक डवरी हे गेल्या अनेक वर्षांपासून जोंधळे परिवाराला त्रास देत असून देशसेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबाला असा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही संघटना करत आहेत.